जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालय व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पती संजय माने व ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण, संदीप जाधव, प्रदीप जाधव, अजिंक्य माने, प्रशांत जाधव, भीमराव राठोड, रूपचंद चव्हाण, अभिजीत तांबे, बालाजी भांगे, लहू कारले, विशाल साखरे, ओमकार राठोड, रमेश राठोड, विलास फुकटे, शिवाजी पालमपल्ले, नागु स्वामी, वसंत चव्हाण, बाबुराव राठोड, प्रमोद चव्हाण, शेतकरी, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.