वागदरी : एस.के. गायकवाड

 प्रज्ञा शिल करूणेचा संदेश देणारा पंचशील तत्वावर आधारित तथागत भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म म्हणजे  मानवाच्या कल्याणाचा मार्ग होय.म्हणूनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म दिला असून तथागतांच्या सदधम्माचे अचरण करणे गरजेचे असल्याचे मत रिपाइंचे जिल्हा सचिव  धम्म सेवक एस.के.गायकवाड यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे  व्यक्त  केले.

 वागदरी येथील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने बुद्ध मूर्ती स्थापना प्रथम वर्धापन दिना निमित्त  सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्ररंभी मान्यवरांच्या हस्ते  तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी  चंद्रकांत वाघमारे यानी मनोगत व्यक्त केले.  अभार ग्राम पंचायत सदस्य रावसाहेब वाघमारे यांनी केले.शेवटी दिवंगत धम्म सेवक नागनाथ धाडवे यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्ताने त्याना भावपुर्ण श्रध्दांजली वाहून शरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच नागनाथ बनसोडे,  मोहन वाघमारे, बळीराम धाडवे,कुंडलीक वाघमारे, महादेव वाघमारे, शिवाजी वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, रावसाहेब, वाघमारे,सादु वाघमारे, युवा कार्यकर्ते लक्ष्मण वाघमारे, अजय मुकदन सह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top