खानापूर : बालाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील पूर्वीच्या   कोरोना पॉझिटीव्ह  रुग्णाच्या संपर्कातील आणखी 2  व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.यामुळे काटगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काटगाव येथील एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 22 जणांना तपासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.यामधील 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 52 जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यापैकी 45 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पॉझिटिव्ह आलेले 2 रुग्ण हे शिवाजीनगर तांडा,खडकी येथील आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर व गल्ली  सील करण्यात आली आहे. तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना तपासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे डॉ. पुंडे यांनी सांगितले.
           
काटगाव व शिवाजीनगर तांडा खडकी येथील प्रतिबंधित क्षेत्राला आमदार राणाजगजितसिंह पाटील,तहसीलदार सौदागर तांदळे,  तालुका वैद्यकीय अधिकरी पवार , सभापती मुळे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या.ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये,काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
 
Top