खानापूर : बालाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटगाव व शिवाजीनगर तांडा खडकी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या पाश्वभूमीवर  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

तुळजापुर तालुक्यातील  काटगाव येथे सुरूवातीस 1  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. सध्या त्याच्या संपर्कातील  एकूण 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काटगाव व शिवजीनगर तांडा खडकी येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंबंधी यंत्रणेला  सूचना दिल्या.

  
शिवाजीनगर तांडा खडकी येथील डॉक्टरांचा काटगाव येथे खाजगी दवाखाना आहे. सदरील डॉक्टर आजारी झाल्याने त्यांची कोरोना टेस्ट घेतली असता ते पॉझिटिव्ह निघाले आहेत.उपचाराच्या निमित्ताने गाव व परिसरातील अनेकांशी त्यांचा संपर्क झालेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या संबंधित डॉक्टरांच्या संपर्कात कितीजण आले याची माहिती घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.कोरोनाचा संसर्ग हा वाढत असला तरी देखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतः देखील योग्य ती काळजी घेतली तर हा आजार टाळता येऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

     यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे,गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी श्री.पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पुंडे,पिंटू मुळे, उपसभापती अण्णा सरडे, वसंतराव वडगावे,सोमनाथ कांबळे, उपसरपंच अशोक माळी, बाबा बेटकर,खंडू पावले, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top