नळदुर्ग, दि. 02 :
सुन- सारिका शिवानंद कारले, रा. जळकोट, ता. तुळजापूर यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) शिवानंद विश्वनाथ कारले (पती) 2)विश्वनाथ कारले (सासरा) 3)रेणुका कारले 4)सिध्दु कवटे (पतीचे मामा) 5)रत्नाबाई कवटे (पतीची मामी), सर्व रा. जहकोट, ता. तुळजापूर यांनी सन 2018 पासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. तसेच सारिका यांचे वडील समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करुन मारहाण केली. अशा मजकुराच्या सारिका कारले यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.