काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या वतीने येथील शिवसेना कार्यकर्त्यां मार्फत कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबियांना होमिओपॅथीच्या "अर्सेनिक अल्बम 30 च्या 300 गोळ्यांच्या बॉटल येथील सरपंच रामेश्वर तोडकरी, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या होमिओपॅथीच्या या"अर्सेनिक अल्बम 30'च्या गोळ्यांच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि कोरोना विषाणूला प्रतिकार करुन शरीर निरोगी राहण्यास मदत होणार असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच रामेश्वर तोडकरी, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत माळी, बाळासाहेब डोके, संजय कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.