काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 13 रोजी संध्याकाळी कोरोना संदर्भात सर्व पक्षीय आढावा बैठक घेण्यात आली. काटी गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या शेजारील सावरगावात तीन कोरोनाबाधित तीन रुग्ण आढळल्याने आपल्या गावात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून गावातील सर्व पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत एका व्यक्तीने दारु पिऊन गोंधळ घालीत बैठकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिडलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावात सुरू असलेली हातभट्टी दारु, गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठक सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून आपल्या गावाशेजारील सावरगाव येथे कोरोनाबाधित तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी गावातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वानूमते गावात कोरोना प्रादुर्भाव रोखणसाठी गुरुवार दि. 16 ते रविवार दि. 19 पर्यंत जनता कर्फ्यु पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गुरुवार ते रविवार या चार दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असून गावात प्रवेश करण्यासाठी बसस्थानकाकडील एकच मार्ग खुला राहणार असल्याचे सांगून या कालावधीत कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, विनामास्क व सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सरपंच आदेश कोळी यांनी सांगितले. यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत आणि गावात झालेल्या अतिक्रमण विरोधात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तयारी दर्शवली.
यावेळी सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,प्रदीप साळुंके, उपसरपंच सुजित हंगरगेकर,माजी सरपंच अशोक जाधव, पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले,अनिल बनसोडे,माजी सैनिक श्रीकांत गाटे,पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, करीम बेग, शिवलिंग घाणे, सुहास साळुंके, नामदेव काळे, हेरार काझी, नजीब काझी, दत्तात्रय सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.