बार्शी, दि. 10 : कोरोनाच्या संकटात फेस मास्क वापरणे अनिवार्य आहे. कुणी साध्या कपड्यांचा मास्क वापरतात तर कुणी एन ९५ (N95) मास्क वापरत आहे. मात्र बार्शी येथील एका युवकाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. या सोन्याच्या मास्कची किंमत जवळपास 2 लाख 40 हजार इतकी आहे.
एकिकडे सोने-चांदीच्या दरात दररोज वाढ होत असताना दिसत आहे आणि त्याच काळात बार्शी (जि. सोलापूर) येथील व्यावसायिक सागर जानराव यांनी चक्क 5 तोळे सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. जवळपास 2 लाख 40 हजार किंमतीचा मास्क तोंडावर अकडवून जानराव सध्या वावरत आहेत. त्यांच्या या मास्कची सध्या बार्शीसह परिसरात चर्चा रंगत आहे. तसेच हा मास्क आहे तरी कसा हे पाहण्याची उत्सुकताही अनेकांना लागली आहे.
