तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात फेब्रुवारी २०२० बारावी परीक्षेचा निकाल ८०.२१℅ लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण व सचिव उल्हास बोरगावकर यांनी अभिनंदन केले आहे.
फेब्रुवारी २०२० बारावी परीक्षेमध्ये विज्ञान शाखेमधून सोमवंशी शैलेश शाहूराज ( ७१.२३ ℅ ), कला शाखेमधून नदाफ रियाज रफिक ( ७४.१५℅ ), वाणिज्य शाखेमधून हंचाटे रोहिणी नागनाथ ( ७९.७७% ), एम. सी व्हि सी शाखेतून मारुती भैरू कुंभार ( ६७.६४℅ )हे प्रथम आले आहेत. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर, उपाध्यक्ष संभाजीराव बाभळगावकर ,सचिव उल्हास बोरगावकर, संचालक बाबुराव चव्हाण, संचालक राम आलुरे, प्राचार्य डॉ मोहन बाबरे, वरिष्ठ विभाग उपप्राचार्य डॉ एम बी जाधव, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे, अधीक्षक धनंजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे.