जळकोट : मेघराज किलजे
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि१७. ते२७ जुलै या कालावधीत होणाऱ्या शिवसप्ताहाच्या नवव्या दिवशी नंदगाव( ता.तुळजापूर) येथे मास्क व अर्सोनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
ग्राहक संरक्षण कक्ष तुळजापूर तालुका प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या हस्ते मास्क व अर्सोनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर घोडके, शिवबा राजे प्रतिष्ठान, तुळजापूर संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंके, शिवसेना सो.मि.ता.प्रमुख चेतन बंडगर, सिद्राम कारभारी, शंकर गव्हाणे, जि.प.वि.प्र.संतोष घोडके ,युवा सेना शाखाप्रमुख परमेश्वर चिनगुंडे, सिध्दाराम कुंभार, सो. वि.प्र. जितेंद्र माने, सागर तांबोळकर, सचिन मोरे, संजय पाटील, पंकज पाटील, शेखर खांडेकर,प्रभाकर चिनगुंड्डे, बालाजी बंदिछोडे, संभाजी माने, नामदेव डेंग, श्रावण जमादार ,सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.