तुळजापूर, दि. 25 : तालुक्यातील कदमवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची कदमवाडी गावास भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी गावातील लोकप्रतिनिधी, नागरिकांशी चर्चा केली. कॉरनटाईन केलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात यावी. गावामध्ये आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. तसेच नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन खा. निंबाळकर यांनी केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सतिषकुमार सोमाणी, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, स.पो.नि. श्री.काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top