तुळजापूर : कुमार नाईकवाडी
उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे व गटविकास अधिकारी प्रशांतसिंग मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. 8 जुलै 2020 रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय येथे तुळजापूर तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, खाजगी डॉक्टर्स, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन यांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना वर मात करण्यासाठी खालील सूचना वर चर्चा झाली.
सदरील आढावा बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनास पास शिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, पोलिसांच्या पथकाने खानापूर, ढेकरी व तामलवाडी चेक पोस्टवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा, शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये दर शनिवारी जनता कर्फ्यू चे काटेकोरपणे पालन करावे.यामध्येही नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी, खाजगी डॉक्टर यांनी कमीत कमी 300 व्हेंटलेटर सह बेडची व्यवस्था करणेबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या.