तुळजापुर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने दि. ८ बुधवार रोजी तुळजापुर शहरातील नागरीकांना रोग प्रतिकार शक्तीच्या आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्यांच्या डब्बींचे वाटप करण्यात आले.
या वेळी तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, नगरसेवक नानासाहेब लोंढे,अभिजीत कदम,अंबरीष जाधव,विशाल रोचकरी,आनंद कंदले,योगेश रोचकरी,भरत सोनवणे,श्रीनाथ शिंदे,शहाजी भांजी,सुरज जगताप,शिवाजी रोचकरी,हणमंत पुजारी आदीची उपस्थिती होती.