तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि.२० सोमवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने दीप अमावस्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा यांच्या मठात सोमवारी सायंकाळी रुढी पंरपरेनुसार दीप अमावस्या दिनाचे औच्युत साधुन मुख्य महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते दिप पंथ्याचे पुजन करण्यात आले. त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या प्रक्षाळ पुजे नंतर श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारातील पंच धातुच्या दिव्याचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करण्यात आले.
यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा यांनी संपुर्ण भारत देशासह, महाराष्ट्र वरच संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगाच संकट टळु दे, असे साकडे घातले. तसेच दीप अमावस्या निमित्ताने सबंध श्री देवी भक्ताच्या घरो घरी अहंकार दुरु व्हावा, वाईट प्रवतीचा नाईनाट व्हावा, भक्तांच्या घरोघरी प्रसन्नता वाढावी, या उद्दात हेतुने श्री तुळजाभवानी माते समोर साकडे घातले.