मुरुम : 

नाशीकांत गोरोबा डावरे, रा. अचलेर, ता. लोहारा हा दि. 21.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 5 ली. गावठी दारु (किं.अं. 550/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला.

पो.ठा., तुळजापूर : खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दि. 21.07.2020 रोजी तुळजापूर शहरातील हडको येथे एक स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 14 सीएक्स 9243 थांबवून तीची तपासणी केली. या कारमधून आवेज हारुन रुईकर व चेनि गणेश मलंग, दोघे रा. उजणी, ता. औसा हे दोघे 180 मि.ली. च्या विदेशी दारुच्या 90 बाटल्या (किं.अं. 13,500/-रु.) विनापरवाना वाहतुक करत असतांना पथकाला आढळले.
 
Top