तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

सामाजिक कार्यात तत्पर मदत करणार्या बालाजी अमाईन्स लि तामलवाडी ता तुळजापुर यांच्या  वतीने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दि. ८ रोजी  उस्मानाबाद जिल्ह्या रूग्णालयास दोन हाय -फ्लो ऑक्सीजन मशीन भेट देण्यात आल्या आहेत.

      संपुर्ण देशासह राज्यामध्ये कोवीड - १९ चा कहर वाढतच चालला आहे.या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक कार्य करणार्या संघटना आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत.तामलवाडी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी बालाजी अमाईन्स लि. ही कंपनीही यामध्ये आपले मोठे योगदान देत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी दिपा - मुधोळ मुंडे यांच्या ऑक्सीजन मशीनच्या मागणीला व्यवस्थापकीय संचालक डी.राम रेड्डी व राजेश्वर रेड्डी यानी प्रतिसाद देत दि.८ रोजी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयास तात्काळ दोन हाय- फ्लो ऑक्सीजन मशीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या दोन मशीन बालाजी अमाईन्सच्या वतीने जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद येथे डाॅ सतीश सुरवसे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. कोरोनाच्या गंभीर रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांच्याकरीता हे उपकरण खुप सहाय्यक ठरणार असुन जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण घटविण्यासही नक्कीच मदत होणार अशी आशा डी.राम रेड्डी यावेळी व्यक्त केली.

       यावेळी बालाजी अमाईन्सचे मारूती सावंत,विनोद चुंगे,निवाशी वैद्यकीय अधिकारी डाॅ सचिन बोडके,सतिश पवार आदी उपस्थित होते.
 
Top