वागदरी : एस.के. गायकवाड
डॉ. आंबेडकर इंग्लिश मिडियम स्कूल नळदुर्ग ता.तुळजापूर येते इ.७ वी मध्ये शिकत असलेला वागदरी ता.तुळजापूर येथील विद्यार्थ्यांने सायकलचे कोळपे बनविले आहे.
विद्यार्थ्यामध्ये शोधक आणि चिकित्सक व्रती निर्माण व्हावी म्हणून टाकावू पासून टिकावू आणि उपयोगी वस्तू निर्माण करण्यासाठी कार्यानुभव हा विषय शालेय स्तरावर शिकविला जातो.यातून विद्यार्थ्यामध्ये काहीतरी नवीन वेगळी गोष्ट करण्याचीआवड निर्माण होते. याचा प्रत्येय वागदरी ता.तुळजापूर येथे आल्याचे दिसून येते.
डॉ.आंबेडकर इंग्लिश मिडियम स्कूल नळदुर्ग ता.तुळजापूर येथे वागदरी ता.तुळजापूर येथील इ.७ वी मध्ये शिकत असलेला गौरव बालाजी बिराजदार याने लहान मुलांची भंगार मध्ये टाकावू पडलेल्या सायकलीचे मागील चाक काढून त्या जागी शेतातील पिकांची अंतर्गत मशागत करण्यासाठी कोळप्याला लावण्यात येणारी लोखंडी पास बसवून त्या साकलीचा उपयोग कोळपे म्हणून केला.सध्या खरीप पिकांच्या अंतर्गत मशागतीचे दिवस आहेत. जवळपास एक एकर शेतातील अंतर्गत मशागत त्यांनी स्वतः बनविलेल्या सायकल कोळप्याने केली. त्याच्या या अनोख्या उपक्रमाचे शेतकरी ग्रामस्थातून कौतुक केले जात आहे.

