नळदुर्ग, दि. ०९ :

 तमाम आंबेडकरी आनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई दादर येथील राजग्रहावर हल्ला करून राजग्रहाची मोडतोड करणाऱ्या नराधमांचा नळदुर्ग ता.तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. 

   याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि राऊत यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई दादर येथील पुस्तकासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेले राजग्रह हे आंबेडकरी आनुयायांचे प्रेरणा स्थान असून राजग्रहावरील हल्ला हा निंदनीय आहे. या हल्लेखोरावर कडक कारवाई करून सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून या हल्ल्यामागील मुख्य सुत्रधारावर कायदेशिर कारवाई करावी.

सपोनि याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे. जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा युवा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, तालुका संघटक सुरेश लोंढे, अल्पसंख्याक अघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी,आरविंद लोखंडे, चांगदेव रणे,दिपक मस्के,शिवसेना तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top