तुळजापुर : कुमार नाईकवाडी
मुंबई (दादर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या जातीयवादी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर येथील भिमसैनिकांच्या वतीने गुरूवार दि. ९ जुलै रोजी तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
भिमसैनिकांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई (दादर) येथील निवासस्थान असलेल्या राजगृहा वर दोन अज्ञात व्यक्तीनी तोड फोड केली. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असुन त्यांनी सदरील हे निवासस्थान पुस्तकासाठी बांधलेले होते. या निवासस्थानास जगभरातील अनुयायी येथे भेटीला येतात. इतके महत्त्वाचे हे स्थान असताना या ऐतिहासिक राजगृहात दि. ७ रोजी काही माथेफिरुनी तोडफोड करुन नासधुस केली तरी. या माथेफिरुनवर कडक कारवाई करावी, तसेच हे राजगृह राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे, या पविञ ठिकाणी शाषनाने कायम बंदोबस्त ठेवावा, या जातीयवादी गुन्हेगाराचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तमाम भिमसैनिकांच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर सागर कदम, चेतन पांडागळे, सागर पारडे, कुणाल रोंगे, जावेद शेख, प्रकाश कांबळे, लक्ष्मण कदम, हणमंत सोनवणे, गोरक्ष पारदे, श्रीकांत क्षिरसागर, सुरज दांडे आदीसह भिमसैनिकांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
