तुळजापुर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने तुळजापुर तालुक्यातील पंचक्रोशीतील श्री महादेव मंदीरात शिव भक्तांना मंदीरात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शिव भक्तांनी आपल्या घरीच श्री महादेवाची पुजा करण्यात यावी असे आवाहन केल्यानंतर तुळजापुर येथील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या अतिप्राचिन गर्द झाडीत असलेल्या श्री मुधग्लेश्वर महादेव मंदीर बंद करण्यात आले होते. त्यामुळे श्री मुधग्लेश्वर मंदीर परिसरात श्रावन मासाच्या पाहिल्या सोमवारी शिव भक्ता विना सन्नाटा पसरला होता.तसेच येथील सुप्रसिद्ध बारालिंग महादेव मंदीराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
प्रत्येक वर्षी श्रावण मासात या महादेव मंदीरात शिव भक्तांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी श्रावण मासात अनेक शिव भक्त दर्शनार्थ आलेल्या भाविकांना मोफत दुध केळी आदीसह साहित्य भक्ती भावाने सेवा करतात. तसेच धार्मिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात येतात. माञ या वर्षी प्रथमच संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे शिव भक्तांना श्री महादेवाचे दर्शन या वर्षी घेता आले नाही. पंचक्रोशीतील व शहरातील शिव भक्तांनी आपल्या घरीच शिवलिला अमृत वाचुन श्री महादेवाची घरीच यथा सांग पुजा करण्यात आली. मुधग्लेवर महादेव मंदीराच्या लांब अंतरावर बँरीकेटस लावण्यात आले होते. या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.