तुळजापुर : कुमार नाईकवाडी
खासदार शरद पवार यांनी केलेल्या राम मंदीरावरील टिप्पणी संदर्भात त्यांचा निषेध नोदंवुन भा.ज.पा.युवा मोर्चा चे प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली भा.ज.पा.चे नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, तुळजापुर तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापुर तालुका भा.ज.पा. युवा मोर्चा वतीने दि.२७ सोमवार रोजी येथील पोस्ट हाँफीस कार्यालयातील डाक घरा मार्फत "जय श्रीराम" लिहिलेले दोन हजार पोस्ट च्या पञाचा पाठविण्याचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी भा.ज.पा.युवा मोर्चा चे जिल्हाउपाध्यक्ष दिनेश बागल,सचिन रसाळ, बाळासाहेब भोसले, सागर कदम, राम चोपदार, सागर पारडे, अलोक शिंदे, नानासाहेब डोगंरे, शुभम सुरवसे आदीसह भा.ज.पा.युवा मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.