उस्मानाबाद, दि. १८ : कोविड-19 रोगाचा संसर्ग पसरु नये त्यास अटकाव व्हावा या उदेदशाने शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी महामार्गावरील धाबा, मंगल कार्यालय यांच्यावर बंधने घालणारे  विविध मनाई आदेश जारी केले आहेत. प्रशासन त्या मनाई आदेशांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवुन आहे. असे असतांनाही काही प्रमाणात धाबा, मंगल कार्यालय चालक यांच्याकडून मनाई आदेशांचे उल्लंघन होत आहे. अशा मुजोर, बेपर्वा धाबा चालक, मंगल कार्यालय चालक यांना कायदा व नियमांची जरब बसावी त्यांनी मनाई आदेशांचे पालन करावे. या उददेशाने संपूर्ण जिल्हाभरात धाबा, मंगल कार्यालय तपासणीची मोहिम दिनांक 17.07.2020 रोजी राबविण्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांनी ठरविले.


            त्यानुसार काल दिनांक 17.07.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या 331 धाबे व 91 मंगल कार्यालयांची संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपासणी केली. या तपासणीत स्वच्छता, निर्जंतुकीकरण, व्यक्तीगत स्वच्छता, मास्क, हातमोजे, गॉगल, सॅनिटायझ्र, सोशल डिस्टन्सींग, गर्दीचे बंधन इत्यादी संबंधी विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करणा-या 17 धाबा चालकांवर भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये खालील पोलीस ठाण्यांनी गुन्हे नोंदविले आहेत.


उमरगा पो.ठा.- 3, लोहारा पो.ठा.- 2, तुळजापूर पो.ठा.- 2, तामलवाडी पो.ठा.- 1, उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा.- 3, आनंदनगर पो.ठा.- 4, कळंब पो.ठा.- 2 असे एकुण 17 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर शिराढोण पो.ठा. हद्दीतील 3 मंगल कार्यालय चालकांस सी.आर.पी.सी. कलम- 149 अन्वये समज पत्र (नोटीस) देण्यात आले आहे.

मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दल कठोर कारवाई करणार असल्याचा निर्धार मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी व्यक्त केला असुन जनता, व्यावसायीक यांनी मनाई आदेशांचे पालन करुन कोविड- 19 निर्मुलनात आपले अमुल्य योगदान द्यावे. असे आवाहन केले आहे.


 
Top