नळदुर्ग : दहीटणा ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायतकडून अनेक कामाचा शुभारंभ करण्यात आले आहे.
गावात भूमिगत गटारी पाईप लाईन टाकणे, प्रत्येक घराच्या बाथरूमला चेंबर , सर्व चेंबरास जाळ्या बसवण्यात येणार आहेत. त्याबरोबर प्रत्येक घरात जाळी देखील पंचायत कडून देण्यात येणार आहे जेणेकरून कचरा अजिबात त्या पाईप मध्ये जाणार नाही त्यानंतर परत मेन चेंबरला खाली थोडं अंतर ठेवण्यात येणार आहे कारण गाळवट जरी आलं असेल तर ते आपण 2 ते 3 महिन्याला काढण्यात येणार आहे.
सिमेंट काँक्रीट रास्त्याचे काम पहिल्या प्रभागात सुरू आहे. शुद्ध पाणी देण्यासाठी आर ओ प्रणाली बसवण्यात आले आहे. ते लवकरच कार्यन्वित केले जाणार आहे. त्याचबरोबर जुन्या ग्रामपंचायत इमार दुरुस्तीचे काम चालू आहे. येणाऱ्या काळात विकासात्मक काम करण्याचं संकल्प सरपंच अप्पसाहेब बिराजदार , उपसरपंच सोमनाथ गुड्डे यांनी केल्याचे सांगितले .