जळकोट,दि.४ : मेघराज किलजे

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते अमित ठाकरे, अभिजीत पानसे, आमदार राजू पाटील, सरचिटणीस दिलीप धोत्रे, राज्य उपाध्यक्ष जावेद शेख व जिल्हा संघटक अमर राजे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या जिल्हा व तुळजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी जाहीर केली आहे.

या निवडीत जिल्हा सचिव म्हणून नळदुर्ग येथील ज्योतिबा येडगे यांची निवड घोषित केली आहे. त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून महेश जाधव यांची निवड जाहीर केली आहे. तुळजापूर तालुकाध्यक्षपदी जळकोट येथील मल्लिकार्जुन कुंभार यांना संधी देण्यात आली आहे. तर तुळजापूर विधानसभा अध्यक्ष म्हणून मयूर गाढवे यांची वर्णी लागली आहे. तुळजापूर तालुका सचिवपदी धनाजी साठे तर तालुका उपाध्यक्षपदी रोहित दळवी, राहुल गायकवाड, प्रशांत डोलारे व शिवाजी झाडपिडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
 
Top