काटी : उमाजी गायकवाड
भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी व विविध सेलच्या नियुक्त्या अखेर शुक्रवारी करण्यात आल्या. यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रदेश पातळीवर संधी देण्यात आली आले. उस्मानाबाद येथे आपला वकील व्यवसाय सांभाळत उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यात भाजपचे सुरुवातीपासून सक्रिय राजकारणात असणारे तुळजापूर तालुक्यातील केमवाडी सारख्या ग्रामीण भागातील निष्ठावंत कार्यकर्ते अॅड. अनिल काळे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी पुनश्च वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांची फेरनिवड झाल्याने निवडीचे स्वागत होत आहे. ग्रामीण भागातील निष्ठावंत कार्यकर्त्यांला भाजप श्रेष्ठीनी पुनश्च संधी दिल्याने अॅड. अनिल काळे समर्थकांमधून समाधान व्यक्त होत आहे.