तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील किसान ईरीगेशन इनस्फ्रास्टक्चर लि. या कंपनीमध्ये काम करणारे बोरामणी तांडा जि.सोलापूर येथील दोन कामगारांना दि.०३ रोजी कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.ते बोरामणी तांडा येथील पुर्वीच्या कोरोना रूग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
बोरामणी तांडा जि. सोलापूर येथील दोन कामगार तामलवाडी येथील किसान ईरीगेशन इनफ्रास्टक्चर लि.या ठिकाणी कामास आहेत.ते दोन्ही कामगार बोरामणी तांडा येथील पुर्वीच्या कोरोना रूग्णांच्या संपर्कात आले असल्याचे माहीती मिळताच तहसीलदार सौदागर तांदळे,तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार,सावरगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्मिता लोंढे यानी तामलवाडी येथील किसान ईरीगेशन इनफ्रास्टक्चर लि. येथे भेट देऊन परीस्थितीची पहाणी केली व त्या दोन संशयित कामगारांची विचारपुस करून त्याना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तुळजापुर येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.तामलवाडी येथील पुर्वीचा सोलापूर रीटर्न एकमेव रूग्ण बरा झाल्याने तामलवाडी व परीसरातील जनतेनी सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु किसान कंपनीमध्ये बोरामणी तांडा येथील दोन कोरोना संशयित आढळुन आल्याने पुन्हा तामलवाडी व परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.हे दोन कोरोना संशयित आढळल्याने किसान कंपनी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार सौदागर तांदळे यानी दिले आहेत.तसेच सर्व कामगारांची तपासणी करून घेऊन बाहेरील एकही कामगार आतमध्ये येऊ देऊ नये व प्रत्येकांनी मास्क व सॅनिटाइजरचा वापर करावा तसेच सगळीकडे जंतुनाशक औषधाची फवारणी करून घेण्याच्या सुचनाही तहसीलदार सौदागर तांदळे यानी कंपनीला दिल्या आहेत.
यावेळी ग्रामविकास अधिकारी पी.एन.लाटकर,तलाठी विठ्ठल शिंदे,आरोग्य सेविका संगीता चव्हाण,प्र.सरपंच दत्तात्रय वडणे,ज्ञानेश्वर माळी,किसान कंपनीचे वरीष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.