तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अँड स्वाती नळेगावकर व सचिवपदी निर्मला जाधव यांची निवड झाल्या बद्दल श्री वीरशैव जंगम मठाच्या वतीने दि.७ मंगळवार रोजी नुतन अध्यक्ष व सचीव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना अँड नळेगावकर यांनी शहराच्या रोटरीच्या इतिहासात प्रथमच महिलांची निवड झाली आहे.ही मोठी जबाबदारी असून रोटरीच्या माध्यमातून आमच्या कार्यकाळात महिलांसाठी शहरात विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अँड. अंजली साबळे, अस्मिता शेटे, वैशाली धरणे, शारदा बडुरे, राजश्री धरणे, निर्मला कोरे, विजया शेटे आदी उपस्थित होते.