कळंब : मौजे खेर्डा, ता. कळंब येथील ग्रामपंचायतसाठी 14 व्या वित्त आयोग अंतर्गत सन- 2016- 17 मध्ये पाईप लाईन मंजुर झाली होती. 1)तत्कालीन शाखा अभियंता (नाव उपलब्ध नाही)  2)मुद्रीकाबाई साधुराम लिके, रा. खेर्डा, ता. कळंब (तत्कालीन सरपंच) 3) शशीकांत गजेंद्र पवार (तत्कालीन ग्रामसेवक) या तीघांनी संगणमताने त्या पाईप लाईनचे काम प्रत्यक्षात न करता त्याचे बनावट मुल्यांकन करुन जुन्या पाईप लाईनचे काम दर्शवले. त्या मोबदल्यात दि. 22.06.2017 ते 02.03.2018 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कळंब येथुन 1)मुद्रीकाबाई साधुराम लिके, रा. खेर्डा, ता. कळंब (तत्कालीन सरपंच) 2) शशीकांत गजेंद्र पवार (तत्कालीन ग्रामसेवक) या दोघांनी संयुक्त स्वाक्षरीने 1,32,000/-रु. रक्कम प्राप्त करुन शासकीय पैशाचा अपहार केला आहे.

अशा मजकुराच्या श्री. तुकाराम जाधव, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कळंब यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीतांविरुध्द भा.दं.सं. कलम- 409, 420, 468, 471 अन्वये गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top