तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचा पादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध योजना बाबतीत गुरुवार  दि. २३ जुलै रोजी महसुल विभाग, नगरपरिषद विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगावर विशेष बैठक संपन्न झाली. 

सदरील बैठकीस जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,  तहसिलदार सौदागर तांदळे, उपविभागीय  पोलिस अधिकारी दिलीप टिप्परसे यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध योजनाबाबत सर्व सन्माननीय सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. सदर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनाबाबत सर्व सदस्यांना अवगत केले व आगामी काळात घेण्यात येणारे विविध प्रकारचे सर्वेक्षण थर्मल स्केनिंग, ओक्सीमीटर आणि रेपीड ऐटोजन टेस्ट व इतर प्रकारचे सर्वेक्षणाची कामे  सदस्य त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांच्या मदतीने तसेच नगरपरिषद कर्मचारी,  तहसील कार्यालयातील कर्मचारी व शिक्षक यांच्या मदतीने पूर्ण करण्यास सुचना दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी नगरपरिषदेचे वतीने कोरोना संदर्भातील केलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली. तसेच सदस्यांच्या वतीने येणाऱ्या विविध अडचणी उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर मांडल्या. त्यावर त्यांनी  कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले.  सदर सभेसाठी सर्व न.प. सदस्य, कार्यालय अधिक्षक पाठक, स्वच्छता निरीक्षक शेख आदी उपस्थित होते.

 
Top