तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

सोलापूर रोडवरील उस्मानाबाद जिल्हा सीमेवर CCTV बसवून सीमा बंदी उलंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन येथील सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर दि.१७ जुलै रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांना दिले.

निवेदनात  म्हटले आहे की, कोरोना 19 विषाणूमुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य प्रादुर्भाव रोखण्याचे काम जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद या नात्याने योग्य कर्तव्य बजावत आहात. यात काही शंका नाही, आपण दिलेल्या आदेशाचे जिल्हा सीमेवर  काटेकोर पणे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात कोरोना पेशंट ची वाढती संख्या लक्ष्यात घेता आपण कडक आदेश देऊन सुद्धा आपल्या आदेशाचे उलंघन कर्मचारी व नागरिकांकडून  होत आहे, उस्मानाबाद जिल्हा सीमेवर असणारे कर्मचारी वाहनाच्या पास बद्दल कसलीच विचारणा करत नाहीत , सोलापूर जिल्ह्यातून बरेच नागरिक विनापास तुळजापूर शहरातून  उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी कडक पाऊल उचलण्याची गरज आहे, जिल्ह्याच्या सीमेवर CCTV कॅमेरा द्वारे निगराणी करावी  आपल्या आदेशाचे उलंघन करणाऱ्या नागरिक आणी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर संजयकुमार बोंदर यांची स्वाक्षरी आहे.

सोलापूर रोडवरील उस्मानाबाद जिल्हा सीमेवर CCTV बसवण्यासाठी पोलिस अध्यक्ष राज तिलक रौशन यांना सूचना  दिली  आहे कारवाई करतील. अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधुळ - मुंडे यांनी संजयकुमार  बोंदर यांना देण्यात आली.
 
Top