तुळजापूर, दि. 16 : तुळजापूर नगर परिषदेचे द्वितीय माजी  नगराध्यक्ष बुध्दवाशी शहाजी आनंतराव कदम यांचे वयाच्या ८९व्या वर्षी अल्पशा आजाराने (दि.१६)गुरूवार रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दु:खद निधन झाले.

शहाजी कदम यांच्या कार्यकाळामध्येच शहरात भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला.   आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते होते. त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात निस्वार्थ काम करून आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली  नातु,नात असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरताच आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. आंबेडकरी, सर्व सामाजिक  राजकीय पक्षाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. 
 
Top