तुळजापूर : कुमार नाईकवाडी

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्त तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने दि. १७ जुलै ते २७ जुलै या कालावधीत तुळजापूर शहरासह तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि.१७ जुलै ते २४जुलै या कालावधीत तुळजापूर तालुकास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त युवक युवती विद्यार्थी बंधूनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन  शिवसैनिक  रोहित नागनाथराव चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top