तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील नागरीकांना युवा नेते तथा आडत व्यापारी अभिषेक शंकर कोरे यांच्या वतीने दि.१६ गुरुवार रोजी बारुळ येथील 600 कूटूंबाना मोफत आर्सेनिक अल्बम 30C गोळया आणि कोरोना रोगावरती मात करण्यासाठी माहिती, घ्यावयाची काळजी असे पांपलेट पुस्तक मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी बारुळ चे सरपंच शहाजी सुपनार, उपसरपंच सुभाष पाटील, नाभीलाल शेख, कमलाकार ठोंबरे, भास्कर क्षीरसागर, संजय ठोंबरे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदीसह नागरीक उपस्थित होते.