काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सावरगावातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील काटी येथे एक रुग्ण आढळल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच आदेश कोळी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, कोरोना कक्ष प्रमुख तलाठी प्रशांत गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अनिल बनसोडे, दत्ता छबिले, प्रशांत सु्रवसे यांच्या मार्फत गुरुवार व शुक्रवारी रोजी सकाळी येथील प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या कुंभार गल्ली, बसस्थानक परिसर, बॅंक परिसर, मेडिकल, किराणा दुकान, खत दुकान, परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणचा परिसर फवारणी पंपाच्या सहाय्याने प्रभावी औषध  सोडियम हायप्रोक्‍लाराईडने फवारणी  करुन परिसर निर्जंतुकीकरण  करण्यात आला‌. तसेच आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्त्या मार्फत प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबातील सदस्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले.


 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात येणारी महाराष्ट्र ग्रामीण बॅंक,जिल्हा मध्यवर्ती बँक, मेडिकल दुकान, खत दुकाने पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.


 
Top