तुळजापूर, दि. २५  : रोजगार हमी योजनेतून तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे मजुरांना काम उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे यासंदर्भात शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेऊन मजुरांना काम उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे, याप्रकरणी तुळजापूरचे तहसीलदार डॉक्टर सौदागर तांदळे यांच्याकडे काम सुरू करण्याची मागणी आमदार संवाद मंच यांच्या मार्फत केली जाणार आहे.

 आमदार संवाद मंच चे सदस्य क्रीडाशिक्षक अनिल धोत्रे आणि संवाद मंचचे सचिव तथा जिल्हा समन्वयक संपर्क संस्था मुंबई यांनी पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बसवंतवाडी येथील वृक्षारोपण भेट दिली. गेल्या वर्षी केलेल्या वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करणारे सामाजिक वनीकरणचे प्रतिनिधी यांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळाला मनापासून समाधान वाटले कारण होते लावलेल्या झाडांची झालेली उत्तम वाढ.

तुळजापूर नळदुर्ग महामार्गावर 15 किलोमीटर अंतरावर वसंतवाडी पार्टी आहे या पार्टीपासून गावापर्यंत आमदार संवाद मंच आणि सामाजिक वनीकरण यांच्या प्रयत्नाने गेल्यावर्षी पावसाळ्याच्या अगोदर वृक्षारोपण करण्यात आले यानिमित्ताने करण्यात आलेले वृक्षारोपण गेल्या वर्षभर शासकीय यंत्रणेमार्फत संगोपन केल्यानंतर आज झाडाची उंची किमान सात फुटापर्यंत आणि जास्तीत जास्त दहा फुटापर्यंत पोहोचली आहे वृक्ष लागवड केली तेव्हा तीन फुटाचे उंची चे झाड लावण्यात आले होते यामध्ये वड, पिंपळ, लिंब अशा गावरान वृक्षाचा समावेश आहे घनदाट झाडी उपलब्ध व्हावी आणि बसवंतवाडी गाव हिरवेगार व समृद्ध दिसावी म्हणून हे वृक्षारोपण करण्यात आले होते.

भेट दिल्यानंतर क्रीडाशिक्षक अनिल धोत्रे यांनी बसवंतवाडी येथील ग्रामस्थांचे आणि वृक्ष संगोपन करणाऱ्या यंत्रणेचे मनापासून कौतुक केले बसवंतवाडी ने प्रत्येक प्रकल्पामध्ये आपला जीव ओतून योजना यशस्वी करण्यासाठी सुरुवातीपासून खूप चांगले कष्ट केलेले असल्यामुळे बसवंतवाडी येथील वृक्षारोपण देखील तेवढेच यशस्वी झालेले आहे आज भेट दिली आणि मनापासून आनंद वाटला असे त्यांनी सांगितले.

संपर्क संस्थेचे जिल्हा समन्वयक अनिल आगलावे यांनी बसवंतवाडी गावाबद्दल रोजगार हमी योजनेच्या कामासाठी ग्रामस्थांची खूप मोठी मागणी आहे, शासकीय यंत्रणेने बसवंतवाडी येथील रोजगार हमी योजने मधून विविध कामे करण्यासाठी पुढाकार घेण्याची खूप मोठी गरज आहे या आपत्तीच्या आणि अडचणीच्या काळामध्ये लोकांना कामाची गरज आहे तालुक्याची प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी बसवंतवाडी येथे काम उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यानिमित्ताने केली आहे वृक्ष संवर्धन उपक्रमाला भेट दिली तेव्हा तेथील मजूर आणि ग्रामस्थांनी पत्रकार म्हणून सदर विषय प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे.
 
Top