नळदुर्ग, दि. 23 : राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत "जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी" या खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्चाराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ नळदुर्ग येथे शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि यांना निवेदन देण्यात आले.
राज्यसभेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली शपथ संपल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा छत्रपती शिवाजी महाराज व जन्मभूमी महाराष्ट्र विषयी आदरयुक्त उल्लेख केल्याने यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतल्याने महाराष्ट्रभर याचा निषेध होत असून नळदुर्ग येथे ही शिवसेनेच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर युवा सेना उप तालुकाप्रमुख सुनील कदम, सोमनाथ म्हैत्रे, नेताजी महबोले, चंद्रकांत सगरे, सुनील गव्हाणे आदीजण उपस्थित होते.