तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे वाढता पादुर्भाव लक्षात घेता नगरपरिषद, पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानास प्रतिसाद देत गुरुवार दि. २३ जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यूला तुळजापुर करानी चांगला प्रतिसाद दिला. तसेच व्यापा-यांनाही प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला होता. या जनता कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवा दुध विक्रेत्यास सकाळी ६ ते ९ या वेळेत चालु होत्या. तसेच येथील हाँस्पीटल जवळील फक्त मेडीकल चालु होती.
या जनता कर्फ्यूच्या काळात दवाखान्यात जाण्यासाठी येथील युवा नेते आनंद कदंले मिञ मंडळाच्या वतीने नागरीकांना अँटो रिक्षाची सोय करण्यात आली होती. व्यापारी वर्गानी आपली दुकाने पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील भाजी मार्केट ही बंद होती. शहरातील बँकानेही या जनता कर्फ्यू पाठींबा दिला होता. शहरातील नागरीकांनी आपल्या घरीच राहणे पसंद केले.
शहरात दिवसभर पोलीसांनी आपली पेट्रोलिगं ठेवली होती. माञ तोंडावर मास्क न लावणाऱ्या, टु व्हीलरवर डबल सीट व विनाकारण फिरणार्या नागरीकांना पोलीसांनी कायद्याचा बडगा दाखविला. यामुळे तुळजापुर शहरातील मंदीर परिसर, भवानी रोड, मेन रोड ,शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, नळदुर्ग रोड, उस्मानाबाद रोड आदीसह सर्व रस्त्यावर शुक शुकाट पसरला होता. शहरातील बाजार पेठा जनता कर्फ्यू असल्यामुळे सामसुम झाल्या होत्या. शहरात पोलीसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. तसेच नगरपरिषद मार्फत ही शहराच्या बाहेर नाका बंदी केली होती. सोलापूरहुन येणाऱ्या खाजगी वाहनास उस्मानाबाद बायपास मार्गे सोडण्यात येत होती. या बायपास ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शहरात कोणतेही वाहने येण्यास मज्जाव केला होता. तुळजापुर शहराचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व कांही नगरसेवक स्वतः जातीने शहरात लक्ष देत होते.