तुळजापुर : कुमार नाईकवाडी

राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून याबाबचे निवेदन दि. २३ गुरुवार रोजी तुळजापुर तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या  निवेदनात असे म्हटंले आहे की,  राज्यसभेत नवनिर्वाचित खासदार छ.उदयनराजे भोसले यांनी शपविधी नंतर जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवराय अशी घोषणा दिली. त्या दरम्यान राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांनी त्यावर आक्षेप घेतला.   छ. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे व देशाचे दैवत असून त्यांच्या नावाला विरोध  करणे म्हणजे तमाम महाराष्ट्रातील व देशातील शिवप्रेमींचा अपमान आहे. त्यामुळे राज्यसभा सभापती व्यंक्कया नायडू यांचा तुळजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी रा.काँ. चे गोकुळ शिंदे, धनंजय पाटील, धैर्यशील पाटील, संदीप गंगणे, सचिन कदम आदी उपस्थित होते.
 
Top