नळदुर्ग, दि. ६ : कोरोना मुक्त झालेल्या नळदुर्ग शहरात खबरदारी म्हणुन संसर्गजन्य आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुकानात येणा-या ग्राहकांना मास्कसह आवश्यक साहित्य वाटपाचा शुभारंभ सोमवार रोजी पञकाराच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील एम. एम. मार्केटींग अँड इलेक्ट्रॉनिक्सच्यातने पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्याना सुरक्षेसाठी मास्क, हँडग्लोज, चष्मा या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही यावेळी एम. एम.मार्केटिंग व इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने मास्क देण्यात आले.
नळदुर्ग येथील एम. एम. मार्केटिंग व इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सैफन शेख हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सैफन शेख यांनी कोरोनाच्या संकटात गरीब व गरजु कुटुंबाना अन्न धान्य तसेच किराणा साहित्य वाटप केले आहे. यापुर्वी रमजान ईद निमित्त अणदूर, खुदावाडी व निलेगाव येथील गरीब मुस्लिम कुटुंबाना किराणा साहित्य दिले . एकुणच व्यवसाय करीत असताना गरीब व गरजुना मदत करण्याचे काम सातत्याने सैफन शेख हे करीत आहेत.
दि ६ जुलै रोजी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत असलेले पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना मास्क, हँडग्लोज व कोरोनाच्या विषाणूपासुन डोळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी विशेष चष्मा वाटप करण्यात आले. शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, लतिफ शेख ,,दादासाहेब बनसोडे, उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे, आयुब शेख, जहीर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, पद्माकर घोडके व अमर भाळे यांना सैफन शेख यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी दुकानात खरेदीसाठी येणारे ग्राहक, मास्क नसलेल्या अशा ग्राहकांनाही मोफत मास्क देण्यात आले. पत्रकार विलास येडगे व सैफन शेख यांच्याहस्ते ग्राहकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी अक्रम शेख, अब्दुल शेख, लक्ष्मण गायकवाड, वाजीद वळसंगकर,इस्माईल शेख, इरफान शेख, साजीद शेख, आकाश सुरवसे, कुमार सुरवसे,तोफिक मुजावर, दयानंद कांबळे , सोहेल कुरेशी, दानिश शेख उपस्थित होते.