तुळजापूर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदी मनसेचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते मयुर गाढवे यांची निवड करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे,आमदार राजूदादा पाटील, सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे, राज्य उपाध्यक्ष जावेदभाई शेख, जिल्हाअध्यक्ष प्रशांत नवगिरे, संघटक अमर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. या निवडीचे मनसे सैनिकांमधुन स्वागत होत आहे.