तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

तुळजापुर शहरातील मशिदींवरील भोंगे बंद करण्यात यावे अशा प्रकारचे एक लेखी निवेदन हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर यांच्या वतीने दि ६ सोमवार रोजी तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की,  तुळजापुर शहरातील मशीदीवर भोंगे लावुन त्या भोंग्या मधुन होत असणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे आम्हां नागरीकांना नाहक ञास होत आहे.मशीदीवर लावलेल्या भोंग्यामुळे ध्वनी प्रदुषणाच्या कायद्याचा भंग होत आहे येथील मंगळवार पेठ,शुक्रवार पेठ व वेताळ नगर येथील मशिदीवर चे भोंगे तात्काळ बंद करण्यात यावे या मशीदीवरील भोंगे लावणे व त्यावरुन दिवसातून पाचवेळेस ध्वनी प्रदुषण करणे हे कोणत्याही स्वरुपाचा धार्मिक व मुलभुत हक्क नाही या स्वरुपाचा निर्णय मा.न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी यापुर्वीच दिला आहे.


 या निवेदनावर महंत मावजीनाथ महाराज, महेश गरड,गिरीश लोहरेकर, दिनेश कापसे,बालाजी जाधव,ओंकार पवार,युवराज शिंदे,विशाल निंबाळकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व शहर रहिवासी यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top