उमरगा, दि. ०६ :

 प्रथममेश किशोर यादव, वय 3 वर्षे रा. बालाजीनगर, उमरगा हा दि. 05.07.2020 रोजी दुपारी 01.30 वा. सु. त्याच्या घरा समोर खेळत होता. खेळतांना तो वाट चूकल्याने घरा पासुन दुर गेला. तो बेपत्ता झाल्याने कुटूंबीयांनी उमरगा पोलीस ठाणे गाठले. यावर पोलीसांनी प्रथमेश याचे छायाचित्र व तो बेपत्ता झाल्याची बातमी कोरोना वॉरीयर्स यांच्या सहकार्याने स्थानिक व्हाट्सअप गटांत प्रसारीत करुन बीट मार्शल यांना त्या परिसरात गस्त करण्यास सांगीतले. पोलीस व कोरोना वॉरीयर्सच्या प्रयत्नांना यश मिळुन बालाजीनगर पाठीमागे भटकत असलेल्या प्रथमेशला त्याच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रथमेश सापडल्याने त्याचे कुटूंबीय भारावून जावून त्यांनी कोरोना वॉरीयर्स व पोलीसांचे आभार व्यक्त केले.
 
Top