जळकोट,दि.१४ : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील नवी पेठ येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त सहशिक्षक शिवाजी खंडू चंदे (वय-६८)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार (दि.१४) रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर जळकोट येथील स्मशानभूमीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,१ मुलगा, सून,४ मुली, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले होते.