तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सध्या कोराना संसर्गजन्य साथीच्या रोगाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता तुळजापूर येथील म.रा.विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग आपला जीव मुठीत घालुन सध्याच्या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता राञ न दिवस नागरीकांसाठी अहोराञ परिश्रम घेत असल्याने तुळजापुर येथील माजी नगराध्यक्ष कै. विश्वासराव रोचकरी यांच्या स्मरणार्थ येथील महावितरण कर्मचाऱ्यांना दि.१४ मंगळवार रोजी सँनीटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, म.रा.वि.मंडळाचे कार्यकारी अभियंता बी.के शिंदे, उपकार्यकारी अभियंता गोदे, सहाय्यक अभियंता सिंग, उटगे, नगरसेवक सुनील रोचकरी, पंडीतराव जगदाळे, दिलीप रोचकरी, महावितरणचे कर्मचारी प्रसाद महामुनी, नितीन जाधव, शशीकांत रोडे, आप्पा रोडे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.