तुळजापूर : कुमार नाईकवाडी

सातत्याने शिवसेनेने अडचणीच्या काळात  नागरिकांना मदत केलेली आहे,  कोरोनाच्या या अडचणी मध्ये देखील शिवसेना  तालुक्यातील नागरिकांच्या सोबत आहे अशी ग्वाही शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी सावरगाव येथे दिली.

सावरगाव ता. तुळजापूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर धाराशिव चे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास  पाटील यांनी सावरगाव येथील कोविंड १९ प्रतिबंधक शेत्रातील नागरिकांना वाटप करण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकारक गोळ्या उपलब्ध करून दिल्या. यानिमित्ताने तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी व उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांनी ग्रामीण भागातील जनतेने आपल्या अडचणीसाठी शिवसेनेकडे संपर्क करावा शिवसेना निश्चित यांच्या अडचणीला मदत करेल असे आवाहन केले आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, सरपंच रामेश्वर  तोडकरी यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या पाकिटे वाटप करण्यात आल्या.  यावेळी चंद्रकांत माळी ,संजय कोळी ,शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब डोके, पत्रकार दादा काडगावकर उपस्थित होते.
 
Top