महादेव देविदास  हांडे  81.40 प्रथम
महादेव देविदास  हांडे  81.40 प्रथम


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेने  यावर्षीही घवघवीत यश संपादन करीत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून प्रशालेचा 90.90. टक्के निकाल लागला आहे.यंदाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील जिल्हा परिषद  प्रशालेतील एकूण 22 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यात तीन विद्यार्थी, प्रथम श्रेणीत नऊ विद्यार्थी, तर आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये चि.महादेव देविदास हांडे 81.40 टक्के, चि. तन्मय सतीश साळुंके 80.40 टक्के, व प्रथमेश जितेंद्र जाधव 79.00 टक्के गुण मिळवित या तिन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या उज्ज्वल यशाच्या वैभवशाली परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

तन्मय सतीश साळुंके 80.40

    ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. शालु प्रफुल्ल म्हेत्रे उपाध्यक्ष अरुण गाटे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक संजय जाधव, सहशिक्षक अहमद सय्यद, गुरुप्रसाद भूमकर, शिवाजी राठोड, हनुमंत कदम, संजयकुमार भालेराव, श्रीमती क्षिरसागर, श्रीमती सुरवसे, श्रीकांत पांगे, मल्लिकार्जुन घोडके यांच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रथमेश जितेंद्र जाधव 79%


 
Top