चि.राम प्रकाश गाटे 94.60 टक्के


काटी : उमाजी गायकवाड 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल बुधवार  दि. ( 29 ) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. तुळजापूर  तालुक्यातील काटी  येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित, येडेश्वरी कन्या प्रशालेने आपल्या उत्तुंग यशाची परंपरा यंदाही कायम राखत प्रशालेचा 98.18 टक्के  निकाल आहे.  
कु. साक्षी संजय अंधारे 92.60 टक्के

प्रशालेतील यशस्वी  विद्यार्थी,  विद्यार्थीनींचे ग्रामस्थामधून कौतुक केले  जात आहे.  या प्रशालेतून एकूण 55 विद्यार्थी  परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले  असून  यामध्ये 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 25 विद्यार्थी विशेष प्राविण्यात  उत्तीर्ण झाले आहेत.

कु. साक्षी नाबाजी ढगे 89.60 टक्के

 यापैकी प्रथम तीन क्रमांका मध्ये चि.राम प्रकाश गाटे 94.60 टक्के, कु. साक्षी संजय अंधारे 92.60 टक्के, साक्षी नाबाजी ढगे 89.60  टक्के गुण मिळवीत या तीन विद्यार्थ्यांनी संस्था व शाळेच्या उज्ज्वल यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.संस्थेच्या वतीने संस्थापक मनोहर सपाटे, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन मोहनराव गोरे यांनी प्रशालेची यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्रशालेचे  मुख्याद्यापक सुनिल खेंदाड, सहशिक्षक दिगंबर कदम, किशोर बनसोडे, गणेश गुंगे यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

 
Top