काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कसई येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपाच्या सौ. नुरजान फत्तु शेख यांची निवड झाल्याबद्दल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कसई गावचे सरपंच सौ अश्विनी विजय शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य शेषराव चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ सापते, शालेय समितीचे अध्यक्ष रमेश कामठे, तानाजी पाटील, महेंद्र सुरवसे, कुंडलिक भोवाळ, रवी कुलकर्णी, धनंजय साखरे, उमेश कबाडे, भाजपाचे अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष रफिक शेख, प्रदीप पात्रे, पृथ्वीराज कोळी, अमीर शेख, दशरथ घोंगते, लहू सापते, तुकाराम म्हमाणे, सुजित जाधव आदीजण उपस्थित होते.