तुळजापुर : कुमार नाईकवाडी
शहरातील डॉ आंबेडकर चौकाजवळ असलेला हॉटेल चालक कोरोना बाधीत झाल्याने तुळजापुरात एकच खळबळ माजली असुन हाँटेल चालकाच्या संपर्कातील आलेल्या हॉटेलातील कामगारासह सह एकुण १५ जनाना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सदरील हॉटेल चालक मु.पो.सावरगाव ता.तुळजापुर येथील असुन गेल्या कांही वर्षापासुन तुळजापुरात हॉटेलचा व्यवसाय करीत आहे. या हॉटेल चालकास कांही दिवसापुर्वी ताप आला होता. उस्मानाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा स्वँब घेतला असता तो पाँझीटीव्ह आला. तो राहत असलेल्या व हायरिस्क भागातील सावरगाव येथील व तुळजापुर येथील त्याच्या कामगार वर्गाना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदरील व्यक्तीचा मोठा जनसंपर्क आल्याने आरोग्य, पोलीस, नगरपरिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
