उस्मानाबाद, दि. 10 : कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. असे असतांनाही काही उपद्रवी लोक त्या आदेशांचे उल्लंघन करत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर दररोज नाकाबंदी केली जात आहे. नाकाबंदी दरम्यान कायदा- मनाई आदेशांचे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि. 09.07.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 09/07/2020 रोजी 542 कारवाया करुन 1,01,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.
